रमाकांत घागरे यांच्या निवास्थानी 21 दिवसाचा गणेशोत्सव
आचरा (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मालवण तालुक्यातील चिंदर तेरईवाडी येथील रमाकांत घागरे यांच्या निवास्थानी 21 दिवस विराजमान “पारिजातचा राजा” गणरायाचे आज वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक- प्रकाश पेडणेकर व भाजप पंचायत समिती प्रभारी, उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी अमित घागरे व कुटुंबिय, शशिकांत घागरे, मेस्त्री, गणेश भक्त आदी उपस्थित होते.