आमदार नितेश राणे यांनी नुकसान पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई प्रस्ताव देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती चे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भातपिक संततधार पावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई चा प्रस्ताव शासनास सादर करावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे की मागील 15 दिवस दररोज सिंधुदुर्गात पाऊस पडत आहे. खरीप हंगामातील भात हे सिंधुदुर्गात प्रमुख पीक असून सध्या भातपिक कापणीयोग्य झाले आहे.मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भातकापणी करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई प्रस्ताव शासनाला सादर करावा.