आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथील दोन वर्षांपूर्वी विजयी झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विद्यमान सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला आयनलमध्ये मोठे खिंडार पडले आहे. यावेळी संदेश सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते. गाव विकासासाठी सर्वांनी एका विचाराने चालणे अपेक्षित आहे. आज सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आणि त्यांच्यासोबत अनेक गावकऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. आता तुमच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची आणि गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याची जबाबदारी आमची आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.