सोनगेवाडी मित्रमंडळाच्या वतीने रंगपंचमी उत्सवाचे आयोजन

सुजित जाधव यांचा पुढाकार

डॉल्बीच्या ठेक्यावर साजरी होणार रंगपंचमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात उद्या 21 मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांच्या पुढाकारातून शहरातील सोनगेवाडी मित्रमंडळाच्या वतीने 21 मार्च रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान शेळके हॉस्पिटल च्या बाजूला रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत भिजत एकमेकांना रंग लावत एकोप्याच्या भावनेने या रंगपंचमीत सोनगेवाडीतील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!