हास्य कल्लोळ स्पर्धेत अस्सल मालवणी संघ लय भारी…!

द्वितीय सिंधुरत्न मालवण,तृतीय कलमठ बाजारपेठ तर उत्तेजनार्थ रंगखाम कणकवली…!

विविध संघांनी सादर केलेल्या सोंगांना रसिकांचा उत्स्फूत दाद…!

आज रात्रौ ९ वा. रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा…!

कणकवली (प्रतिनिधी) : कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने बाजारपेठेत
आयोजित केलेल्या पाचव्या वर्षातील ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवली संघाने प्रथम क्रमांक मिळवला. सिंधुरत्न मालवण संघाने द्वितीय तर कलमठ बाजारपेठ संघाला तृतीय क्रमांक . उत्तेजनार्थ पारितोषिक रंगखाम कणकवली संघाने प्राप्त केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील १० संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन महापुरुष मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल मुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी दत्ता सापळे, अरविंद मुंज, दिलीप पारकर, चंदू सावंत, बाळामेनकुदळे, शेखर ओरसकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद
अंधारी, राजेश सापळे,नीलेश धडाम,राजन पारकर, मंदार सापळे, महेंद्र सांबरेकर,दिनेश नार्वेकर, उदय मुंज, मुकुंद खानोलकर, हर्षल अंधारी, नीलेश धडाम, महेंद्र सांबरेकर,हरिष उचले,सोहम वाळके,चेतन अंधारी, प्रद्युम मुंज,संदीप अंधारी,आदी उपस्थित होते.

अस्सल मालवणी क्रिएशनने बाबल्याची पँट बरबाटली या थीमवर सोंग सादर केले. सिंधुरत्न मालवण संघाने बाहुबली सिनेमाच्या ऑडिशन थीमवर सोंग सादर केले.तर कलमठ बाजारपेठ संघाने देवतरंग या थीमवर सोंग सादर केले. रंगखाम
कणकवली संघाने पोवाडे सादर करून ज्वलंत सामाजिक विषयांवर जनजागृती केली. याशिवाय अन्य संघांनी विविध विषयांवर सोंगे सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे, अभिनेते श्याम सावंत यांनी केले.ही स्पर्धापाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

आज रात्रौ ९ वा. रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा…
कणकवली बाजारपेठ च्या मांडावर आज रात्रौ ९वा. मांडावरील राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कुडाळ,नेरूळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला असून आपण रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापुरुष मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!