“माहेर वासिणी भवानी आई” हा दशावतार नाट्य प्रयोग
आचरा ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथे शनिवार, दि. १३ मे रोजी प्रतिवर्षी प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती, दुपारी १२.३० ते २ महाप्रसाद, सायं. ६ ते ७ हळदी-कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ७ ते ८ वा. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मार्गदर्शन, रात्री ९.३० वा – सुस्वर भजन, रात्रौ ठिक १० वा. श्री अष्टविनायक पारंपारिक दशावतारी नाट्य मंडळ, निरवडे, ता. सावंतवाडी यांचा “माहेर वासिणी भवानी आई” हा नाट्यप्रयोग श्री महापुरुषदेव पटांगण, चिंदर नागोचीवाडी येथे होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा व दशावतारी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंदर नागोचीवाडी युवक मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांनी केले आहे.












