भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या पाठपुराव्याला यश

१३६ ताडपत्री लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग सन २०२०-२१ साठी शेतकऱ्यांना ताडपत्री ही योजना राबविली होती. मात्र अनुदान प्राप्त नसल्याने तब्बल 136 लाभार्थी या योजनेच्या लाभांपासून वंचित होते. याबाबत सातत्याने मागणी करून अखेर नुकतीच या ताडपत्री लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली. याकरिता भाजपचे तालुकाध्यक्ष माजी उपसभापती मिलींद मेस्त्री यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी सदर अनुदानाची रक्कम जमा झाल्याबद्दल खातर जमा करावी असे आवाहन श्री. मेस्त्री यांनी केले आहे.

error: Content is protected !!