पंतप्रधान मोदी मडगाव मध्ये दाखवणार हिरवा झेंडा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्याने मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत सेवा नियमित सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. २९ मे पासून ही सेवा सुरू होणार असून, मडगाव येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याआधी मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चावत आहेत. मुंबई- गोवा वंदेभारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी पाचवी सेमी हाय स्पीड ट्रेन असेल, चेन्नईस्थित कोच फॅक्टरीमध्ये बंदे भारत तयार झाली आहे. वदेभारत अत्याधुनिक ट्रेन असून, ताशी १८० की मी वेगाने पळेत यात स्वयंचलित दरवाजे, वायालाय, जीपीएस आधारित प्रवाशांना माहिती, आरामदायी आसने, एरोडायनामिकल डिझाईन आणि ३० टक्के ऊर्जा बचत मुळे वंदे मातरम् दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.












