समीर नलावडेंच्या भाजपा संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात माजी नगराध्यक्ष नलावडें व त्यांच्या टीम ने शहरविकासाचे उत्कृष्ट काम केले आहे. नगरपंचायत प्रशासकीय काळात जनतेची कामे खोळंबू नयेत यासाठी हे संपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र होईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. आमदार नितेश राणेंच्या हस्ते माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कणकवली शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे उदघाटन शनिवारी सकाळी करण्यात आले.यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी गटनेता संजय कामतेकर, माजी नगरसेवक अभि मुसळे, ऍड, विराज भोसले, बाबू गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे,बंडू गांगण, शिशिर परुळेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजश्री धुमाळे, गीतांजली कामत, साक्षी वाळके, प्राची इस्वलकर, सदडेकर, अभय राणे, महेश सावंत, शाम दळवी, सुशील पारकर, गणेश तळगावकर, कल्याण पारकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.












