कणकवली (प्रतिनिधी): पडेल ग्रामपंचायत येथील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार सौ.सायली अजय वारीक प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. आमदार नितेश राणे यांची सायली वारीक यांनी कणकवलीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पडेल ग्रा पं सरपंच भुषण रामदास पोकळे, ग्रा.प.सदस्य प्रभाकर वाडेकर, शक्ती केंद्र प्रमुख अंकुश ठुकरल , अजय म.वारीक उपस्थित होते. आमदार नितेश साहेब यांच्या कामाचा धडाका बघून ग्रामस्थांनी एकतर्फी विजय मिळवून दिला दिला व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पराभव झाला आहे.
आ. नितेश राणे यांनी पडेल ग्रा पं नूतन सदस्य सायली वारीक यांचे केले अभिनंदन












