खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कुरंगावणे गोठणकरवाडी येथील श्री विठूमहाकली स्पोर्ट्स कुरंगवणे गोठनकरवाडी या मंडळाच्या वतीने नुकत्याच मर्यादित शटकांच्या भव्य खुल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. या कार्यक्रमाला कुरंगवणे – बेर्ले गावचे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार,सामाजिक कार्यकर्ते श्री बाबू जाधव,महावीर गोसावी,ग्रामस्थ नारायण कदम, पांडुरंग गोठणकर,विष्णू कदम, दिनकर गोठणकर,विश्वनाथ कदम, गणेश गोठणकर,सचिन गोठणकर, सूरज गोठणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ५००० /- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ३०००/- रुपये आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,शेत्ररशक व मालिकावीर या खेळाडूना देखील आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे प्रथम व द्वितीय पारितोषिक कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे उपसरपंच बबलू पवार यांनी पुरस्कृत केले होते.













