चिंदर बाजार साई मंदिर येथे आज साईभंडारा…!

आचरा (प्रतिनिधी): चिंदर बाजार येथील साई मंदिर येथे 19 व्या वर्धापन दिना निमित्त आज 20 मे रोजी साईभंडारा व सत्यनारायण पुजा महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सकाळी- 8 वा. साई मूर्तीवर अभिषेक व नित्य पूजा, सकाळी 10 वा. सत्यणारायण पूजा, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद, संध्याकाळी – सुस्वर भजने, रात्रौ 10 वा. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड वेगुर्ले यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविक भक्तांनी तिर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. दशावतार नाट्यप्रेमींनी दशावतार नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन ओम साई मित्रमंडळ चिंदर बाजार यांनी केले आहे.

error: Content is protected !!