श्रीधर नाईक उद्यान “प्रकाश झोतात”

युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते निवेदन

आचरा (प्रतिनिधी) : कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यान आता प्रकाशमय झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने माजी नगरसेवकांनी कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले होते. व मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी श्रीधर नाईक उद्यान येते विद्युत रोषणाई ची समस्या दूर केली.

error: Content is protected !!