Modi@9 विकास तीर्थ रॅलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

कुडाळ (अमोल गोसावी) : ” जे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले गेल्या ९ वर्षांमध्ये घेतलेले देशासाठीचे निर्णय हे जनतेला समजावेत देशाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास जनतेला दिसावा म्हणून मोदी @ ९ अंतर्गत विविध कार्यक्रम भाजपच्या वतीने हाती घेतले जात आहे. त्यामधील झाराप ते ओरोस पर्यंत विकास तीर्थ अशी मोटार सायकलची काढलेली रॅली हा त्याचाच एक भाग आहे हा महामार्ग सुद्धा मोदी सरकारमुळेच झाला आहे. ” असे प्रतिपादन मोदी @ ९ चे लोकसभा संयोजक व माजी खासदार निलेश राणे यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ घेतलेल्या सभेत केले. या मोटरसायकल रॅलीला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला.

मोदी @९ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात देशाच्या विविध भागांमध्ये केलेल्या विकासाची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत विकास तीर्थ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे यामध्ये मोदी सरकारच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणजे मुंबई- गोवा हा महामार्ग चौपदरीकरण करण्यात आला त्यामुळे भाजपच्या वतीने विकास तीर्थ अंतर्गत झाराप झिरो पॉईंट ते ओरोस पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, श्री रावराणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाई सावंत, माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ तालुका मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, विशाल परब, आनंद शिरवलकर , अविनाश पराडकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झाराप झिरो पॉईंट पासून विकास तीर्थ मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते माजी खासदार निलेश राणे हे स्वतः मोटरसायकल चालवत होते. ही रॅली ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभा घेऊन समाप्त करण्यात आली.

यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की मोदी सरकारमध्ये अनेक योजना तसेच विकासाची अनेक मोठमोठी कामे झाली. ही कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा विधानसभा या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुकांमध्ये विकास हाच अजेंडा घेऊन आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे असे सांगून काँग्रेस पक्षाने अनेक विकासाची कामे रखडवली होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कामे मार्गी लावली काश्मीरमध्ये देशाचा झेंडा फडकवला आणि त्याच काश्मीरमध्ये बर्फामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पर्यटनाचा आश्वास घेऊ शकले असे सांगून येत्या निवडणुकांमध्ये शत प्रतिशत भाजप दिसले पाहिजे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले तर ते अशक्य काही नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोरस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले.

error: Content is protected !!