कणकवलीतील हळवल परबवाडी येथील रहिवासी गणपत सीताराम परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवल परबवाडी येथील रहिवासी गणपत सीताराम परब ( वय 82 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी शनिवार दिनांक 29 जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, पुतण्या, नातवंडे, जावई, असा परिवार आहे. हळवल गावचे माजी सरपंच रवी परब यांचे ते वडील होत. अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून गणपत परब सर्व परिचित होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!