डॉ गद्रे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर तर्फे 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर
कालावधी 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असलेल्या डॉ गद्रे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर च्या वतीने 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात कॉम्प्युटराईज्ड मशिनद्वारे चष्म्याचा नंबर तपासणे, मोतीबिंदू तपासणी , लालसर होऊन डोळे येणे वर प्रतिबंधात्मक उपाययोजना सल्ला, नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) तपासणी, मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या रुगांसाठी नेत्रपटल तपासणी व चिकित्सा, लासुरु तपासणी, डोळ्यांच्या तिरळेपणा ची तपासणी मोफत केली जाणार आहे. या शिबिरातील रुग्णांसाठी फाेल्डेबल लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 6 हजार रुपयांत केली जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांची बिनटाका शस्त्रक्रिया फक्त 2 हजार रुपयांत केली जाणार आहे. अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी केली जाणार असून नेत्रगत व नेत्रपटलगत ( डोळ्याच्या मागील पडदा ) आजारांची तपासणी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे. लेन्स च्या मागील जाळी साफ करून दिली जाणार असून नेत्रपटलगत आजारांवर लेझरद्वारे चिकित्सा करून शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
लासुरु शस्त्रक्रिया आणि तिरळेपणा वरील शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. संपर्कासाठी कणकवली मोबा. 7841849947, देवगड मोबा. 7218280183 / 8605742572 , कुडाळ मोबा.9405618421 / 8605742572 , मालवण मोबा. 7498340696 / 8605742572
सावंतवाडी मोबा. 9420260401 / 8605742572, वेंगुर्ले मोबा. 8237557461 / 9421557461 / 02366 295966 येथे संपर्क साधावा











