सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

विजेत्या आणि सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र देऊन करण्यात आला गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्भूमीवर दि.३ मार्च २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर हेल्थ” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ उपस्थित मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिपेला पुष्पहार अर्पण करून व भगवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या मॅरेथॉन स्पर्धेला खारेपाटण मान्यवर सरपंच प्राची इसवलकर, माजी पं.स. सदस्या तृप्ती माळवदे, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, बँकेच्या निवृत्त अधिकारी दीपा रानडे, खारेपाटण वनरक्षक चंद्रिका लोहार,पत्रकार अस्मिता गिडाळे आदि मान्यवर उपस्थित होते.तर या मॅरेथॉन स्पर्धेत महिलांसह लहान मुले युवक – युवती ,जेष्ठ नागरिक यांनी मोठ्या उस्ताहात सहभाग घेतला होता.

खारेपाटण येथे संपन्न झालेल्या या सिंधुदुर्ग मॅरेथॉन स्पर्धेत किड्स रन – (मिनी मॅरेथॉन)अंतर – २.५ किमी., वुमेन्स रन – (हाफ मॅरेथॉन) – अंतर – ५.० किमी., ओपन रन -(फूल मेरेथॉन )अंतर -१०.० किमी. असे विविध टप्पे ठेवण्यात आले होते.तर १० किमी. सकाळी ६.१५ वा., ५ किमी.सकाळी ६.२५ वा. तर २.५ किमी.- सकाळी ६.३५ वा. या वेळेनुसार स्टार्ट अप सुरवात करण्यात आली. ही मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण पोलीस चेकपोस्ट समोरील ब्रीज ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चींचवली कडे जानाऱ्या रस्त्यावर घेण्यात आली होती. तर या स्पर्धेत १०किमी अंतर धावणे यासाठी १८ स्पर्धक, ५ किमी अंतर धावणे यासाठी – ४९ स्पर्धक, तर २.५किमी अंतर धावणे यासाठी ६३ स्पर्धाकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. प्रत्येक रन मधील पहिल्या अनुक्रमे तीन नंबरना मेडल व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शूभहस्ते गौरविण्यात आले.
या मॅरेथॉन मध्ये १० किमी. धावणे प्रथम -निलेश लक्ष्मण कांजीर, द्वितीय -प्रतीक संदीप भालेकर, तृतीय -सूरज संतोष रानम यांनी बहूमान पटकवला. तसेच ५ किमी धावणे प्रथम – शोभा दशरथ पाटील, द्वितीय -प्राजक्ता दीपक पाटणकर, तृतीय -संजना सतीश सावंत अश्या स्पर्धेकांनी बहुमान पटकवला. तर 2.5 किमी धावणे प्रथम -वेदिका अनिल पवार, द्वितीय – साहिल संग्राम अडुळकर, तृतीय -हर्षल लक्ष्मण अडुळकर,यांनी बहुमान पटकवला.तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील मंडळाच्या वतीने देण्यात आले.

तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पाणी व नाश्ता ची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण चे वैद्यकिय पथक देखील हजर होते. तसेच रामेश्वर – जिजामाता नगर मित्र मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.तसेच डॉक्टर मालंडकर यांनी सुद्धा सखी महिला मंडळ आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.स्पर्धेला उपस्थित असणारे सौ.सुजाता संजय देसाई यांनी सखी महिला मंडळ संघाला ५०००/- रुपये ची देगणी दिली.

सखी महीला मंडळ च्या अध्यक्षा -प्रणाली पंकज कुबल, उपाध्यक्षा -पूजा पाटील व सर्व महिला कार्यकर्ते या सर्वांनीच ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.या उपक्रमाबाबत सखी महिला मंडळ चे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.या संपूर्ण स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक मंगेश गुरव यांनी केले.

error: Content is protected !!