खारेपाटण नगर वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील नगर वाचनालय खारेपाटण येथे मराठी साहित्यातील कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंतीचे औचित्य साधून मराठी राजभाषा गौरव दीन नगर वाचनालय खारेपाटण च्या अध्यक्षा मंगला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच वाचनालयाच्या ग्रंथालय कार्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगर वाचनालय खारेपाटण चे विश्वस्त संतोष पाटणकर,राजेश वारंगे, विजय देसाई, अशोक नवरे, नगर वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ कर्मचारी बाबू लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मराठी साहित्य साहित्यातील कवी कुसुमाग्रज तथा वी.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला नगर वाचनालयाचे संचालक श्री संतोष पाटणकर व राजेश वारंगे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रंथपाल महेश सकपाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

error: Content is protected !!