सायली सुनील पवार यांना ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर !

हा पुरस्कार भविष्यात प्रेरणादायी- सौ.सायली पवार.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शैक्षणिक-सांस्कृतिक-साहित्य क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नवोदितांची माहिती घेऊन, दरवर्षी पलपब पब्लिकेशन संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड अंतर्गत,पलपब ” महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४ ” फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका, सौ.सायली सुनील पवार यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. श्रीफळ- स्मृतीचिन्ह- सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार २६ मे रोजी कराड येथे, मान्यवर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सरोजकुमार मिठारी आणि विविध क्षेत्रातील नामवंत यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सौ. सायली पवार यांचे शिक्षण एम ए बी एड असून मागील २५ वर्षे त्या फोंडाघाट हायस्कुल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.एकीकडे पुरस्कारांचा लिलाव सुरू असताना, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि कृष्णा- कोयनेच्या संगमावरील, तसेच विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्याने पवित्र भूमीवरील हा सत्कार आजवर मी केलेल्या नि:पक्ष कार्याची पोचपावती आहे. वडिल कै. वामन राणे यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी, तसेच विविध क्षेत्रात अजूनही भरीव काम करण्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा स्रोत बनेल. असे उद्गार पुरस्कार प्राप्त, सौ. सायली पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

सौ. पवार यांना उचित, यथायोग्य, आणि स्तुत्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाचालक,सहकारी शिक्षक आणि विशेषतः विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!