विनायक राऊत यांच्या मताधिक्क्याची विरोधकांना भीती – वरुण सरदेसाई

कुडाळ (अमोल गोसावी) : आज कोकणात विरोधकांच्या पोटात एकच भीती आहे की विनायक राऊत यांचे लीड किती असेल ? राऊत यांच्यासमोर आचारसंहिता लागूनही गद्दारांचा उमेदवार येत नाही यातच आपला विजय दडलेला आहे असे उद्गार युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. पुढे बोलताना सरदेसाई म्हनाले की, आज देश निर्णायक क्षणावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात ले सगळे रोजगार उद्योग गुजरात ला नेले. युवकांना रोजगार मिळाला नाही. प्रत्येकाच्या खात्यात येणारे 15 लाख आलेच नाहीत. मोदी सरकार ची फसवेगिरी जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. 2200 गावात विनायक राऊत पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. विनायक राऊत यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह सर्व मतदारांपर्यंत न्या.कोण भैया आणि कसला सैया ? असा सवाल करत सरदेसाई यांनी महायुती चे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांच्यावर तोंडसुख घेतले. विरोधात गेलेल्या गद्दारांना आता गाडल्याशिवाय आपण राहणार नाही अशी गर्जना सरदेसाई यांनी केली.

error: Content is protected !!