खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेतील इयता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा तथा निरोप समारंभ शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच खारेपाटण केंद्र शाळेत संपन्न झाला.

या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश गुरव इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका अलका मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील भूतकाळातील भावूक आठवणींना उजाळा दिला.
“विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात पुढे जात असताना आपल्याला ज्यांनी घडवले त्या प्राथमिक शाळेतील शिक्षक व त्या मातृशाळेला कधीच विसरू नये. आपल्या शाळेतून मिळालेली संस्काराची शिदोरी तुमच्या पुढील अयुष्यात नेहमी तुम्हाला उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही.”असे भावपूर्ण उदगार

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी सदिच्छा समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण केंद्र शाळेच्या सन २०२३-२४ या शैशणिक वर्षात शिकणाऱ्या ईयता ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सदिच्छा समारंभ निमित्त शाळेला आर्थिक मदत म्हणून रोख रकमेची देणगी शाळेकडे जमा केली. या कार्यक्रमाच्या अनुशंगणे वर्गशिक्षिका अलका मोरे मुख्याद्यापक श्रावणकर अध्यक्ष प्राप्ती कट्टी माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करत शालेय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.

error: Content is protected !!