जिल्हा न्यायालयात असंरक्षित साक्षीदार जबानी केंद्राचे उदघाटन

ओरोस (प्रतिनिधी) : साक्षीदाराला निर्भयपणे आपली साक्ष नोंदविता यावी यासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा व सत्र न्यायालयात असंरक्षित साक्षीदार जबानी केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कोणत्याही घटनेचा खटला न्यायालयात सुरू असताना त्यामध्ये साक्षीदारा अत्यंत घटक असतो. मात्र काही खटल्यातील साक्षीदारांवर आरोपीचा वचक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही आरोपींना समोर बघितल्यावर साक्षीदार घाबरतात, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयामध्येच असंरक्षित साक्षीदार जबानी केंद्र स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात असंरक्षित साक्षीदार जबानी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच अशा साक्षीदारांसाठी प्रतीक्षालय आणि फ्रेंडली वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. 21 एप्रिल रोजी या केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश २ व सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश श्रीमती ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी श्रीमती एस. के. कारंडे, अतिरिक्त मुख्य न्यायाधीकारी ए. डी. तिडके सर्व तालुका न्यायालयाचे न्यायाधीश, सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता तुषार एरंडे, न्यायालय व्यवस्थापक प्रशांत मालकर, अधीक्षक महेश माणगावकर, उपअधीक्षक शितल सबनीस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!