दारिस्ते बौद्धवाडीवासीयांना संदेश सावंत यांची साथ

पाणीपुरवठ्यासाठी स्वखर्चाने दिला 15 हजार किंमतीचा पाईप

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते बौद्ध वाडी येथे सध्या अती उष्णते मुळे पाण्याची टंचाई जाणवत असते वेळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी तात्काळ समस्या जाणून घेत, 15000 हजार रक्कमेचा 300मीटर लांबीचा पाईप देऊन बौध्दवाडी येथे जाग्या वरती पाणी नेऊन दिले आहे. त्यामुळे बौध्द वाडीतील लोकांची पाण्याची होणारी गैरसोय दूर केल्यामुळे दारिस्ते बौध्द वाडीतील ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले.या वेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, माजी उपसरपंच संजय गांवकर यांनी गोट्या सावंत यांच्या माध्यमातून बौध्द वाडी पर्यंत पाणी पोचवण्यासाठी प्रयत्न केले.या वेळी बौध्दवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!