राजकीय व्यक्तींची गाडी असल्याचा ग्रामस्थांचा होता संशय
राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याची पोलिसांची माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अणाव गावामध्ये संशयास्पद गाडी फिरत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता ही द स्ट्रेलेमा या मार्केटिंग कंपनीची असून त्यातील व्यक्ती मिडियाच्या निवडणूक सर्व्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कुडाळ तालुक्यातील अणाव गावामध्ये गाडी नंबर एम एच – ०५, ए एक्स ९६०१ या गाडीमधील इसम हे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असून कोण निवडून येणार अशी माहिती कलेक्ट करत आहेत असे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर त्या ठिकाणी पीएसआय राजेंद्र दळवी यांनी जाऊन खात्री करून अणाव येथून गाडी मिळून आल्याने ती पोलिस ठाणे येथे घेऊन येऊन खात्री केली असता सदर गाडीमध्ये स्वानंद भारत सुतार वय 24 वर्ष, व्यवसाय नोकरी, मॅनेजर मार्केटिंग संशोधन द स्ट्रेलेमा या कंपनीचे मॅनेजर व सोबत आठ सहकारी स्टाफ होते. या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची संशयास्पद किंवा आक्षेपार्य वस्तू मिळून आलेल्या नसून ते निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार आहेत अगर कसे, जनमत काय आहे? याबाबत माहिती गोळा करून त्याबद्दलची माहिती ते मिडियाला देत असल्याचे त्यांच्याकडे आढळून आल्या. त्यांच्याकडे द स्ट्रेलेमाचे अधीकृत ओळखपत्रे मिळून आलेले असून द स्ट्रेलेमा कंपनीचे डायरेक्टर विशाल लिंगायत यांच्याकडे मो.नं. 7507771248 वर खात्री केली असता ही बाब सत्य असल्याचे समजून आलेले आहे. त्यामुळे त्यांना योग्य ती समज देऊन गाडीसह सोडण्यात आलेले आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी सांगितले.