मयत इसम कोयना नगर सातारा मधील
दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्यातील साटेली भेडशी येथील वामन संकुल इमारतीच्या आवारात अमर मनोहर देशमाने ( वय 50, रा.कोयनानगर सातारा ) याचा अज्ञात इसमाने डोकीत लाकडी फळीने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे. 21 मे रोजी रात्री साडेनऊ ते 22 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा खून झाला आहे. मयत देशमाने याच्या डोकीत अज्ञात इसमाने लाकडी फळीने जोरदार वर्मी प्रहार केला.या हल्ल्यात देशमाने याचे डोके फुटून अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.याबाबतची पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांनी फिर्याद दिली असून दोडामार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करत आहेत.