चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षा मार्च २०२३/२४ चा निकाल १००% लागला आहे. या प्रशालेतून बारावी परिक्षेसाठी एकूण ११४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १००% लागला आहे. यामध्ये विशेष श्रेणीमध्ये २४ विद्यार्थी , प्रथम श्रेणीत ६० विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत २९ विद्यार्थी , तृतीय श्रेणीमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये वाणिज्य शाखेतून कुमारी विशाखा सुनिल रावले (५१४ गुण) हिने प्रथम, कुमारी प्रतिक्षा नीलकंठ मेस्त्री (५०९ गुण) हिने द्वितीय आणि राजकुमार आनंद दुखंडे (५०४ गुण) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तर कला शाखेमध्ये कुमारी रुपाली प्रविण वायंगणकर (४२६ गुण) हिने प्रथम , कुमारी निकिता देउ झोरे (४२५ गुण) हिने द्वितीय आणि कुमारी काव्या सुहास मसुरकर (४०५ गुण) हिने तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, व इतर संचालक तसेच शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.