डॉ. प्रमोद कोळंबकर यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित !

आचरा (विवेक परब) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी तर्फॅ आचरा पिरावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अनेक वर्षे वैद्यकीय सेवा करणारे डॉ. प्रमोद कोळंबकर यांना “राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय नि: स्वार्थी व भरीवपणे कार्य करुन शास्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्टय़पूर्ण गुणवतेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराचे स्वरूप राष्ट्रीय गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, अभिनंदन पत्र, म्हैसूर फेटा, चंदन हार असे आहे.
यावेळी बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर महानगर पालिकेचे महापौर राजू शिंगाडे, विशेष अभियंता जयराम लोंढे, अरविंद धट्टी आदी महनीय व्यक्ती उपस्थित होते.

error: Content is protected !!