विरता साहस मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप – अजयकुमार सर्वगोड

कणकवली (प्रतिनिधी) : महाराणा प्रताप म्हणजे विरता साहस आणि मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक आहेत. महाराणा प्रताप यांचा मातृभक्ती चा वारसा आज संपूर्ण भारतवासीयांना मार्गदर्शक असल्याचे सांगत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महाराणा राजा प्रताप यांची 484 वी जयंती 9 जून रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस प्रतिमेस कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शुभम दुडये, तुषार एरंडे, प्रतिभा पाटील, कुमार स्नेहा लोखंडे आदी कनिष्ठ अभियंता तसेच विभागीय कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!