गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे देवगड तालुक्यात सव्वालाखाची हानी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा-मूळबांध, मणचे, कातवण येथील घरांची पडझड होऊन १ लाख २९ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले. या घरांच्या छपरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. यामध्ये माधुरी महेंद्र मांजरेकर (वाडा मूळबांध) यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले. कल्याण दत्तात्रय जाधव (वाडा मूळबांध) यांच्या घराची सरंक्षक भिंत कोसळून १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. विजय विठोबा अनमने (मणचे देऊळवाडी) यांच्या घरावर डोंगरातील दगड कोसळून नुकसान झाले. ही घटना दुपारी वाजता घडली. यामध्ये सुमारे ७१ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले. घरातील सर्व व्यक्तींना बाजूच्या घरात स्थलांतरित केले आहे. दत्तात्रय कुलकर्णी (हिंदळे) यांच्या घराच्या पडवीवर २६ जूनला रात्री सुपारीची पाच झाडे पडून नुकसान झाले. यात सात हजाराचे नुकसान झाले. कातवण येथील विजय श्यामसुंदर बोरकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडून २० हजाराचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!