मच्छी वाहतूक करणारा टेम्पो सावडाव फाट्यावर पलटी

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबई च्या दिशेने मासे वाहतूक करणारा टेम्पो (KA 26 B 5427) सावडाव फाट्यावर पलटी होऊन टेम्पोचे नुकसान झाले. हा अपघात 13 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी चालकाने दिलेल्या माहितीनुसार टेम्पो चालक शेकप्पा लमाणी हा आपल्या ताब्यातील अपघातग्रस्त झालेला टेम्पो घेऊन गोव्याहून मुंबई च्या दिशेने मासे वाहतूक करत होता. सावडाव फाट्याच्या अलीकडे चालक शेकप्पा याचे टेम्पवरील नियंत्रण सुटले. टेम्पो रोड डिव्हायडरवर चढून पलटी झाला. सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी टेम्पोचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात नव्हती.

error: Content is protected !!