प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आज पासून जिल्हा परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आज पासून जिल्हा परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. गेल्या काही महिन्यापासून शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्र्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने गेल्या काही महिन्यात प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन चर्चा केली. तसेच ९ जुलै २०२४ रोजी लक्ष वेधी धरणे आंदोलन छेडले ,त्यावेळीही संबंधित अधिकारी यांच्या भेटी घेवून लक्ष वेधले होते. परंतू सातत्याने पाठपुरावा करूनही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने पुन्हा आज २२ जुलै २०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आजचे हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत.

आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत यामध्ये

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करण्यात यावे व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबून संबंधित बदलीधारक शिक्षकांना सदरच्या रिक्त जागा दाखविण्यात याव्यात.

समांतर आरक्षणातील समुपदेशन झालेल्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत.

पवित्र प्रणालीने भरती करण्यात येत असलेल्या नवनियुक्त शिक्षक पद भरती बाबतचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्यात यावे.

नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तातडीने मिळणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी.

२००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करणे
निमशिक्षकांची(वस्तीशाळा) नियुक्ती शासन निर्णयांच्या दिनांकापासून करण्यात यावी व फरक मिळावा

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन व्हावे

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्यदी माल वेळेत मिळावा.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी करावा.

२००६ ते ५ सप्टेंबर २०१८पूर्वीच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढ निश्चिती प्रस्तावा विचार व्हावा.

माध्यमिक कडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या व तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना स्थायी आदेश मिळावा.

सन २०१९ मधील मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक मिळावा.

२००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

शनिवारच्या शाळेच्या वेळेबाबत फेरविचार करण्यात यावा.यासह विविध प्रलंबित प्रश्नाकड़े लक्ष वेधले आहेत. आणि याबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तो पर्यंन्त हे आंदोलन बेमुदत सुरु राहिल असा इशारा संघटनेच्या वतीने प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!