मसूरे (प्रतिनिधी) : शिक्षण सप्ताहा निमित्त आर पी बागवे हायस्कुल मसूरे येथे ‘मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस’ साजरा करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक रमेश पाताडे यांनी मुलांना विविध गणिती साहित्याची ओळख करून दिली. त्यामध्ये भौमितिक आकार वजन व मापे तसेच नाणी व नोटा इत्यादींची ओळख करून दिली. भौमितिक त्रिकोण व त्याचे आकार या संदर्भात एक खेळ खेळण्यात आला. भोगले यांनी गुणाकारांचा गणितीय खेळ घेतला. तळाशीलकर यांनी पाढ्यांचा खेळ घेतला तसेच जाधव यांनी बेरजेचा डोंगर हा खेळ घेतला. आभार रमेश पाताडे यांनी मानले.