देवगडात २९ रोजी रंगणार ‘युवासेना भजन स्पर्धा’

देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त देवगड तालुका शिवसेना- युवासेनेतर्फे देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. देवगड तालुका ‘युवासेना भजन स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तेथे रक्तदान शिबीर होणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अरुण दूधवडकर, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, अतुल रावराणे, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, युवासेना देवगड तालुकाप्रमुख

गणेश गावकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रथम क्रमांकाला १५ हजार १११ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय १० हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय ५ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकाला २ हजार १११ व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तबला, पखवाज, तालरक्षक, कोरस, शिस्तबद्ध संघ यासाठीही वैयक्तिक पारितोषिके आहेत. भजन स्पर्धेचा कालावधी ३० मिनिटांचा आहे. सादरीकरणात प्रार्थना, जय-जय राम कृष्ण हरी रुपाचा किंवा ध्यानाचा अभंग, अभंग, गौळण आणि उद्धव ठाकरे यांच्यावर स्वरचित काव्य असावे. अधिक माहितीसाठी गणेश गावकर (९७७३२७२३३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड तालुका युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!