शिवसेना शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश

ऑफलाईन पध्दतीने रेशन धान्याचे होणार वाटप

जुलै महिन्याच्या धान्य वितरणास १० दिवसांची मुदतवाढ मिळणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ऑनलाइन पध्दतीने रेशन धान्य वितरीत करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धान्य वितरणाची ऑनलाईन प्रक्रिया सक्षमरित्या होत नसेल त्याठिकाणी ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यात यावे अशी लेखी मागणी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे आज केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने रेशन धान्याचे वाटप केले जाणार आहे.तसेच जुलै महिन्याच्या धान्य वितरणास १० दिवसांची मुदतवाढ देखील मिळणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

शिवसेना शिष्टमंडळाने केलेल्या मागणीत म्हटले होते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांवर नागरिकांकडून मशीनवर थम लावून ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरीत केले जाते. मात्र अलीकडे अनेक वेळा सर्व्हर डाउन असणे, नेटवर्क नसणे, लाईट नसणे अशा अनेक अडथळ्यांमुळे धान्य वितरणाची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण होत नाही तसेच एका व्यक्तीकडून ४ ते ५ वेळा थम लावल्या नंतरही ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण होत नाही. त्यामुळे नागरिकांना रेशन धान्य दुकानांवर फेऱ्या माराव्या लागतात. त्यांना येण्या जाण्याचा भुर्दंड सोसावा लागतो. याचा सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे धान्य वितरणाची ऑनलाईन प्रक्रिया सक्षमरित्या होत नसेल त्याठिकाणी ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यात यावे. आणि जुलै महिन्याच्या धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती.जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, कृष्णा धुरी, जयभारत पालव, दीपक आंगणे, वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, उत्तम लोके, विकास राऊळ रूपेश आमडोस्कर, आबा मुंज, नागेश ओरोसकर, राजू गवंडे, गुरू गडकर, राजू रावराणे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!