विद्यार्थ्यांनी जिवनात यशस्वी धेय्य प्राप्तीची नशा बाळगावी, अंमली पदार्थांची नशा ही नाशाकडे घेऊन जाते – जयेंद्र रावराणे

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे

पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, वाहतूक पोलीस रणजित सावंत, पोलिस कॉन्स्टेबल राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेचे आर.एस.पी अधिकारी व वैभववाडी पोलिस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी रस्त्यावर प्रवास करताना पाळायचे वाहतूकीचे नियम, घ्यावयाची काळजी व दक्षता, याबाबत व्हिडिओ व छायाचित्रे यांच्या माध्यमातून आर एस पी अधिकारी एस.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूकीची चिन्हे व त्यांचे अर्थ याबाबत आर एस पी अधिकारी एम.एस.चोरगे यांनी चित्रकला विषयाच्या माध्यमातून विविध वाहतूकीच्या चिन्हांचे रेखाटन करून दाखवत विद्यार्थ्यांना विविध चिन्हांबाबत माहीती दिली. अंमली पदार्थांची नशा ही नाशाकडे घेऊन जाते तरी विद्यार्थांनी जिवनात यशस्वी ध्येय्यप्राप्तीची नशा बाळगावी, रस्त्याने वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करावा असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. वैभववाडी पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी नशा मुक्ती, मोबाईल चे दुष्परिणाम, दामिनी पथक याबाबत मार्गदर्शन केले शिवाय वैभववाडी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलीस रणजित सावंत यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व कायदे, वाहतूक चिन्हे यासंबंधी मार्गदर्शन केले. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतूक सुरक्षा किती महत्त्वाची आहे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण दल यांच्या प्रतिज्ञेचे प्रशालेचे आर एस पी अधिकारी व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामुदायिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल तसेच पोलिस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व एक वृक्ष देवून संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख व्हि.एस.मरळकर, वाज.जी.चव्हाण यांनी केले प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी केले व नशा जिवनाची दशा यावर आधारित कविता सादर करून पर्यवेक्षक एस बी शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

error: Content is protected !!