निवृत्त पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी बळवंत राणे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मूळ पेंडूर येथील डॉ. बलवंत प्रभाकर राणे वय 62 यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले होते. आपल्या शासकीय सेवेदरम्यान त्यांनी आचरा, कनेडी शिरोडा, कुडाळ आणि मसूरे मध्ये पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून यशस्वी असे काम केले होते. सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे होते. अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय कामकाज अतिशय चांगले असल्यामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कार मिळाले होते. गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, एक मुलगा, पत्नी, सून, दोन बहिणी, दोन भाऊ, नातू, भाचे असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश उर्फ बाबा राणे यांचे ते वडील होतं.

error: Content is protected !!