खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणची माजी. विद्यार्थिनी कु. तेजस्वी दत्तात्रय नामये राहणार गाव शिडवणे ता. कणकवली जि.सिंधुदुर्ग हिची नुकतीच जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून तिच्या या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कुमारी तेजस्वी नामये ही खारेपाटण कॉलेज मधील हुशार विद्यार्थिनी होती. तसेच तिने क्रीडास्पर्धांमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले होते. सुरुवातीपासूनच पोलीस दलात सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते, ते तिने तीच्या या निवडीने सत्यात उतरले.
तिच्या या अभिनंदनीय यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव- महेश कोळसुळकर, सहसचिव राजेंद्र वरूणकर व संस्थेचे सर्व संचालक तसेच खारेपाटण प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे व सर्व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन कुमारी. तेजस्वी नामये हीचे हार्दिक अभिनंदन केले आहे.