चिंदर गावच्या विकासाचे महत्वपूर्ण पाऊल
पहिल्या टप्प्यातील कामात चिंदर भटवाडी, पालकरवाडी, लब्देवाडी, देऊळवाडी, गावडेवाडी, सडेवाडी भागाचा समावेश
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत हद्दीतील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रकल्प अंतर्गत 11 केवी वाहिनी आणि लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ चिंदर गावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते चिंदर काजरादेव परिसरात करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे याच्या मार्फत मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील कामात चिंदर सडेवाडी, भटवाडी, लब्देवाडी, देऊळवाडी, गावठणवाडीचा काही भाग, गावडेवाडी या भागांचा समावेश असून उर्वरित भाग पुढच्या टप्प्यात होणार आहे अशी माहिती धोंडी चिंदरकर यांनी दिली.चिंदर गावच्या विकासाचे महत्वपूर्ण पाऊल असणाऱ्या या प्रकल्पामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळून, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, मनोज हडकर, दिगंबर जाधव, सहाय्यक अभियंता अनिल मठकर, संदिप सावंत, बाबा कामतेकर, वायरमन संजय परब, केदार गांवकर, सागर परुळेकर, संतोष अमरे, धनंजय धुमडे, रुपेश परुळेकर, सुभाष सावंत, मुजावर आदी उपस्थित होते.
