सरपंच संजना आग्रे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांची प्रमुख उपस्थिती !
शेतकरी-सभासद-ग्राहक-ग्राहक यांनी उपस्थित रहावे असे चेअरमन राजन नानचे यांचे आवाहन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लिमिटेड फोंडाघाट या संस्थेच्या नियोजित “नूतन इमारत” बांधकामाचे भूमिपूजन बुधवार ४ सप्टेंबर २४ रोजी सकाळी ८:३० वाजता सरपंच संजना आग्रे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष व संचालक संजय आग्रे यांचे हस्ते होणार आहे.
या लक्षणीय सोहळ्यास सर्व सभासद, शेतकरी ग्रामस्थ, ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, व्हाईस चेअरमन श्रद्धा सावंत व सचिव प्रसाद देसाई यांनी संचालकांच्या वतीने केले आहे.












