राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत हर्ष जांभळे उपविजेता

हर्ष जांभळे याचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणीच्या ज्ञानवंत ॲड.वासुदेव तूळसणकर ज्ञान संकुलनामध्ये आयोजित प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृह नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी तालुका राजापूर येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.हर्ष विनोद जांभळे याने या स्पर्धेमध्ये उपविजेता प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!