वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक पांडुरंग रावराणे यांचे निधन

संस्थेच्या जडणघडणीत यशवंतरावांचा मोलाचा वाटा – कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक यशवंत पांडुरंग रावराणे. यांचे काल आकस्मिक निधन झाले. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी श्रद्धांजलीपर मनोगतात व्यक्त केले. प्रशालेच्या काही शिक्षकांनी देखील मनोगते व्यक्त केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!