रत्नागिरीतील ५ वर्षीय वृध्द सुरेश लक्ष्मण वाजे हे निराधार बांधव पणदूरच्या संविता आश्रमात दाखल

फोंडाघाटच्या रहिवाशांनी घेतली बाजारपेठेतील निराधार बांधवाची दखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ निराधार वृद्ध बांधव सुरेश लक्ष्मण वाजे या ६५ वर्षीय निराधार व्यक्तीस नुकतेच कणकवली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ३० सप्टेंबरच्या रात्री आश्रय आणि सुरक्षेसाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे. फोंडाघाट येथील प्रिया नारकर यांना एक निराधार इसम फोंडाघाटच्या बाजारपेठेत फिरत असल्याचे आढळून आले. त्यांनी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांना संपर्क करून सदर निराधार बांधवास आश्रमात दाखल करून घेण्याची विनंती केली. संदिप परब यांनी त्यांचे सहकारी व संविता आश्रमचे जनसंपर्क आधिकारी महाबळेश्वर कामत यांना बांधवाची जबाबदारी सोपविली. कामत यांनी फोंडाघाट येथील नागरिकांच्या सहाय्याने निराधार व्यक्तीस कणकवली पोलीस स्टेशनमधे नेले. तेथे त्यांनी त्यांचे नाव सुरेश लक्ष्मण वाजे असे असून ते रत्नागिरीचे असल्याचे सांगीतले. कणकवली पोलीस स्टेशनचे पत्राद्वारे निराधार बांधवास पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे. याकामी फोंडाघाटचे रहिवाशी सुभाष सावंत, ग्रा.पं सदस्य अमित चव्हाण, दिनेश नारकर आणि कुटूंबिय, दिगंबर राऊळ, जयसिंग कोथंबीरे, समिर शिंदे या सर्वांनी पुढाकार घेवून ऊत्स्फुर्त सहकार्य केले.

संविता आश्रमातील बांधव राजु बारस्कर व शिवा यांची बांधवास आश्रमात दाखल करण्यात महत्वाची भुमिका राहिली.याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सविता आश्रमाचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!