श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांचे आयोजन
महिला व मुलांसाठी नऊ दिवस मनोरंजनात्मक खेळाची मेजवानी
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त जयंतीदेवी मंदिरात रवळनाथ पंचायतन देवस्थान व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांच्यावतीने महिला व मुला मुलीसाठी नऊ दिवस मनोरंजनात्मक खेळाची मेजवानी कार्यक्रमाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त 3 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी – चेंडू गोळा करणे, 4 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी – बिस्किट खेळ, 5 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची, 6 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मडके फोडणे, 7 ऑक्टोबर रोजी महिलासाठी बकेटमध्ये चेंडू टाकणे, 8 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी चमचा गोठी, 9 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी तळ्यात मळ्यात खेळ, 10 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी वाटाणे गोळा करणे, 11 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी ग्लास मनोरे रचने व रांगोळी स्पर्धा वेळ 6 ते 8 व लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, 12 ऑक्टोबर रोजी चेंडूने बाटली पाडणे व अंतिम पैठणी साठी स्पर्धा स्पर्धा 9.30 वाजता दररोज वेळेत चालू होणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकासाठी खास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद अक्षय परब मो. नंबर 9405796133 व अमित पुजारे 9420405914 यांच्या जवळ संपर्क साधुन नाव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजित बैठकी वेळी अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार वैभव परब, शेखर पुजारे, अमित पुजारे, बबन पुजारे, अक्षय परब, रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, हितेश सावंत आदी उपस्थित होते.