श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांच्या वतीने आयोजन
मसुरे (प्रतिनिधी) : श्री आई जयंती रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्र उत्सव निमित्त महिलासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. काजल मुणगेकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. इतर स्पर्धा विजेते पुढील प्रमाणे. चेंडू गोळा करणे – प्रथम – सानिका सावंत, द्वितीय – सोनाली परब, तृतीय साक्षी परब. बिस्किट खेळ – प्रथम – सोनाली परब, द्वितीय – उत्कर्षा सावंत, तृतीय – स्वरा सावंत. संगीत खुर्ची-प्रथम – उज्वला परब, द्वितीय मनोरमा पुजारे, तृतीय – किशोरी सावंत. बकेट मध्ये चेडू टाकणे- प्रथम रचना पुजारे, द्वितीय – प्रणिता पुजारे, तृतीय -मंदिरी मुणगेकर. चमचा गोटी प्रथम – उत्कर्षा सावंत, द्वितीय -निकिता पुजारे, तृतीय – जयश्री परब. तळ्यात मळ्यात- प्रथम -उत्कर्षा सावंत, द्वितीय – राखी परब, तृतीय – सानिका सावंत. रांगोळी स्पर्धा – प्रथम मंदिरी मुणगेकर, द्वितीय विशाखा परब, तृतीय ऋत्वी पुजारे. वाटाणे निवडणे- प्रथम – मंदिरी मुणगेकर, द्वितीय – पूनम गोलतकर, तृतीय – विशाखा परब. ग्लास मणोरे रचणे- प्रथम सोनाली परब, द्वितीय ऋत्वी पुजारे, तृतीय विशाखा परब. फेन्सी ड्रेस स्पर्धा- प्रथम मृष्णमयी परब, द्वितीय – अर्णव गोलतकर, तृतीय – स्वरा सावंत. चेंडूने बॉटल पाडणे – प्रथम – काजल मुणगेकर, द्वितीय जयश्री परब, तृतीय सुष्टी जुवेकर. उत्सवात पंचायत समिती गटविकास अधिकारी माळगावकर व सहकारी तसेच शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, डॉ. स्वरा भोगटे, देवस्थान मानकरी अण्णा कापडी, देवस्थान अध्यक्ष रमेश परब, उपाध्यक्ष मधुकर कदम, सरपंच महेश वरक, ग्रामपंचायत सदस्य बाळा तेजम, रुतुजा सावंत, मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम, पर्शुराम परब यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी सर्व चषक अरुण लाड यांनी पुरस्कृत केले. तसेच शेखर पुजारे, तन्वी जुवेकर, वंदना व जोत्सा चिचंवलकर, गोलतकर परिवार, मयुरी परब, रोहिणी पाडावे, दिप्ती पुजारे, मयुरी सावंत, अमित पुजारे, अनुजा राऊत, यांनी देवीचरणी साडी अर्पण केली. ऋत्विक पुजारे, अमोल परब, सिध्देश मांजरेकर, दिपा पुजारे, दिगंबर साटम, समिधा वस्त, आर्शिवाद साटम, पर्शुराम जाधव, देवीदास पुजारे यांनी अल्पोपहार सेवा अर्पण केली. बक्षीस वितरण सुयोग पंडित, पंडित अविराज परब, राजन पुजारे, रमेश परब, दिनेश परब, देवीदास पुजारे, अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार वैभव परब, शेखर पुजारे, अमित पुजारे, बबन पुजारे, अक्षय परब, रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, हितेश सावंत उपस्थित होते.