कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेत इ. ८वीत शिकणारा कु.अश्मित शैलेश मुळीक या विद्यार्थ्याने सातारा या ठिकाणी संपन्न झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग स्तरावर नेतृत्व करत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना मागे टाकत विभाग स्तरावर ५ वे स्थान प्राप्त केले. त्याला या स्पर्धेसाठी त्याचे वडील शैलेश मुळीक, क्रीडा शिक्षक – एस. के सावळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे अध्यक्ष – पुरूषोत्तम दळवी, कार्याध्यक्ष – सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस – विजय सावंत आणि स्कूल कमिटी चेअरमन – के.आर दळवी, प्रकाश दळवी (सल्लागार – कळसुली शिक्षण संघ, मुंबई), मुख्याध्यापक – व्ही. व्ही. वगरे, जय दळवी (खजिनदार – कळसुली शिक्षण संघ, मुंबई ) तसेच शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर सदस्य, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच आजी – माजी विद्यार्थ्यांनी अश्मितचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.