विरोधकांच्या डिपॉझिट जप्तचे उत्तर जनता देईल – नितेश राणे
नवाज खणी बद्दल म्हणाल तर संदेश पारकर ही माझ्याच जुन्या समर्थकांच्या चौकटीत
कणकवली (प्रतिनिधी) : मागील 10 वर्षांत आमदार म्हणून विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या घराघरात मिसळून काम केले आहे. जनतेच्या घरातील सदस्य म्हणून त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुक ही माझी जनताच माझ्यासाठी लढतेय . विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याबाबत किंवा मताधिकक्या बाबत जनताच उत्तर देईल असे सूचक वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक अर्ज वैध ठरल्यानंतर केले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील आमदार नितेश राणे यांनी भाजपाकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर आमदार नितेश राणे मीडियाशी बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बाळा जठार आदी उपस्थित होते.नवाज खाणी हा अपक्ष उमेदवार राणे समर्थक असून नितेश राणेंनीच त्याला मुस्लिम समाजाची मते फोडण्यासाठी उभे केले असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याबद्दल विचारले असता नितेश यांनी सांगितले की तसे असेल तर संदेश पारकर हेही त्याच चौकटीत बसतात, तेही माझे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुणी तोंड उघडायला लावू नये अन्यथा त्यांच्या आणि त्यांच्या पक्षप्रमुखांच्या कुंडल्या बाहेर काढेन असा इशाराही दिला.