ओराेस (प्रतिनिधी) : बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार सुरू असताना मानव आयोग काय करीत आहे ? मात्र, या प्रकरणी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहत आहे. आज जमलेल्या जनतेची बांधिलकी हिंदू समाजाशी आहे. विध्वंसक कामासाठी ही जमलेली गर्दी नाही. तर त्यांच्यावरील अन्याय थांबले पाहिजेत, यासाठी आहे. आजचा हा संदेश आपण एक असल्याचा आहे. मनात आज पेटलेली ज्योत विझवू देवू नका. आपण हिंदू बांधवांसोबत अखंड राहू. यामध्यामातून पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत आपल्या भावना पोहोचतील, असे प्रतिपादन आ दीपक केसरकर यांनी बांगलादेश हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत हिंदूंना संबोधित करताना केले.