मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन
मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे. खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र अनुदान ७ लाख ५० हजार रुपये, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन ७५ हजार रु. देण्यात येते. कृषी विभाग जिल्हा परिषदेमार्फत सिंचनासाठी विहीर २ लाख ५० हजार रुपये, फवारणी यंत्रे, पॉवरविडर, -ग्रासकटर १८ हजार रु. प्रतियुनिट, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रु. प्रतिहेक्टर ०.२० ते २ हेक्टरपर्यंत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकीकरणासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४० टक्के, कमाल १० लाख रुपये व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र ३५ टक्के, कमाल १३ लाख ७५ हजार रुपये, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत पॅकहाऊस व ड्रॉईंग यार्ड उभारणीसाठी अनुदान सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के, कमाल १० लाख रुपये व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र ५० टक्के, कमाल २५ लाख रुपये देण्यात येते. शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.