कणकवली (प्रतिनिधी ) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२३ चा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी २८ विद्यार्थी विशेष श्रेणी व ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक कु. चिन्मयी आशुतोष कानडे (४४१) ७३.५०%, द्वितीय क्रमांक कु. माने ऐश्वर्या रामचंद्र (४११) ६८.५०%, तृतीय क्रमांक कु. शोभना योगेश्वर जंगम (४०७) ६७.८३% मिळवत उत्तीर्ण झाले.
२००९ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाचा निकाल सातत्याने १००% लागत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष मा. श्री. दिपेश नामदेव मराठे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य श्री. जयराज राऊळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












