कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विचारमंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रा.राजश्री साळुंखे ,प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. संदीप साळुंखे, प्रा.गोपाळ पाटील उपस्थित होते.शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला होता.त्यांचे विचार हे दिशादर्शक होते.आजच्या काळातही त्यांचे विचार मोलाचे असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले.यावेळी डॉ. संदीप साळुंखे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून त्यांचे विचार घराघरांत पोचविण्यासाठी युवाशक्तीने पुढे येण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनीही छत्रपती शिवाजी महारांजांचे विचार प्रेरणादायी असल्याचे सांगून शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी प्रा.विजयकुमार सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास व आधुनिक दूरगामी विचार विशद केले.प्रा.हरीभाऊ भिसे यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले.व प्रा.वैशाली पाटील यांनी सिंहगर्जनेतून छत्रपती शिवाजी राजांना मानवंदना दिली. यावेळी संकेत परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रा.हरीभाऊ भिसे व प्रा. डॉ.मारोती चव्हाण यांनी पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंगलदास कांबळे व आभार प्रदर्शन प्रा.गोपाळ पाटील यांनी केले.यावेळी सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.